#MahaYuti
सन २०१४ ते २०१९, व २०२२ ते आतापर्यंत ‘सर्वांगीण विकासाचे’ ‘महाराष्ट्र मॉडेल’ राज्यात प्रत्यक्ष अमलात आणणारे, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, विकासपुरुष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष व महायुती सरकार, महाराष्ट्राच्या विकास यात्रेला आणखी वेगाने अविरत पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा राज्यातील जनता जनार्दनाचा ‘महाजनादेश’ घेत आहेत. हा महाजनादेश पुन्हा मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या सर्व घटकांनी जोमाने काम सुरू केले आहे. महाराष्ट्राची विकासगंगा अशीच अखंडीत प्रवाही ठेवण्यासाठी सर्वांची साथ महत्वपूर्ण आहे, कारण भाजप-महायुती आहे तर गती आहे – महाराष्ट्राची प्रगती आहे.
संकल्प महाविजयाचा !
महाराष्ट्र या आपल्या राज्याची एक वेगळी ओळख आहे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आध्यात्मिक तसेच सामाजिक सुधारणांचे प्रणेते असलेले अनेक संत महात्मे, समाजसुधारक यांच्या या मुलखाने नेहमीच संपूर्ण देशाला व विश्वाला संक्रमण काळात एक विचार व दिशा दिलेली आहे. अश्या या आपल्या महान राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील भाजप- महायुती सरकार, राज्याचा चौफेर व शाश्वत विकासाचे व्हिजन घेऊन वेगाने पुढे जात आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र विकासाच्या सर्व निर्देशकांमध्ये सर्वात पुढे आहे. मग त्यात राज्यात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक, अथवा पायाभूत सुविधांचा विकास किंवा कृषी व संबंधित क्षेत्रांसाठी करण्यात आलेली भरीव तरतूद, अथवा महिला-युवा सक्षमीकरणाचे काम, भाजप महायुती सरकारने सर्वांगीण शाश्वत विकासाचे एक बेंचमार्क सेट केले आहे. यासोबतच भाजप-महायुती सरकारने पुढील काही वर्षात राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन करण्याचे ठेवेलेले उद्दिष्ट्य असो किंवा दुष्काळमुक्त महाराष्ट्र ही राज्याची ओळख असो, यासाठी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप-महायुती सरकारला पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे संकल्प घेऊ यात.
जाहीर प्रचारसभा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
भाजपाला मत म्हणजेच विकासाला मत !
लोकसभा निवडणूक 2024 ची ही निवडणूक ही कुठल्या एका व्यक्तीच्या विजयाची नाही तर ही देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक देशाचा नेता निवडून देण्याची आहे. कमळाचे बटण हे येणाऱ्या पिढ्यांच्या परिवर्तनाचे बटण आहे.
Candidates
Know Your Candidate
Mumbai - Thane
Kalyan - Bhiwandi
Pune
Nagpur
Aurangabad
Nashik