मुंबई, 15 मार्च
जितेंद्र आव्हाड यांनी पोटतिडकीने एका अधिकाऱ्याचा विषय मांडला. हे प्रकरण मी सीआयडीकडे सोपवितो. वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करून निष्पक्षपणे या प्रकरणात चौकशी करण्यात येईल.
मुंबईत अत्याधुनिक सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी 1406 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. बारामतीसाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी सुद्धा प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
सीसीटीएनएस राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आमच्या काळात ठरले होते. आता याचा दुसरा टप्पा हाती घेण्यात येत आहे. अॅम्बिस प्रकल्प सुद्धा आपण राबविला. आता त्याची अधिक व्याप्तीवाढ करण्यात येत आहे.
मोबाईल फॉरेंसिक यूनिट आपण दिले होते. आता आणखी जिल्ह्यांना आधुनिक स्वरूपात तो देण्यात येणार आहे. नक्षल भागात मोठा निधी उपलब्धता करून देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडू नये, असे लेखी आदेश प्रथमच देण्यात आले आहेत. यापूर्वी असे आदेश कधीच लेखी दिले जात नव्हते. वीज नियामक आयोगाने 3.30 रुपये वीज दर निश्चित केला असला तरी शेतकऱ्यांना मोठी सवलत देण्यात येत आहे. सुमारे 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना सवलत दिली जाते आहे.
वीज वितरण हानी कमी करण्यासाठी 13,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ऊर्जा विभागात रिक्त जागा भरण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे.
बेंबळा, जीगाव इत्यादि प्रकल्पांना निधी देण्यात आला आहे. सिंचनाच्या सर्व प्रकल्पांना गती देण्यात येत आहे.
आठवडा 3 दिवस 3
(माहितीसाठी भाषणाची लिंक: https://www.youtube.com/live/YhVuaPQuoAg?feature=share )