Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली : देवेंद्र फडणवीस

By Devendra Fadnavis on June 19th, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

कल्याण, 19 जून

इतरांना गद्दार म्हणणारे उद्धव ठाकरे यांनीच खरी गद्दारी केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याण येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, आम्ही तुम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीकडे नाही ढकलले, तर तुम्ही खुर्चीच्या मोहासाठी विचारांशी गद्दारी केली. भाजपा आणि शिवसेना मिळून मते मागितली आणि खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात. भाजपाच्या पाठित खंजीर खुपसणारे तुम्ही आहात. खरे गद्दार तर तुम्ही आहात, दुसर्‍यांना गद्दार म्हणण्याची तुमची लायकी नाही.

आज राज्यात दोन वर्धापनदिन चालले आहेत, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार वाचविले त्यांचा एक आणि दुसरा ज्यांनी बाळासाहेबांचे विचार बुडविले, त्यांचा चालू आहे. एक काळ असा होता की, संताजी-धनाजी यांची दहशत होती की मुगलांना जळी-स्थळी तेच दिसायचे. आज मोदी आणि अमितभाईंचे नाव घेतले की, उद्धव, पवार आणि काँग्रेस तिघांनाही भीती वाटते. कालचे उद्धव ठाकरेंचे भाषण नव्हते, तर ती ओकारी होती, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खोक्यांचे वर्ष, गद्दारांचे वर्ष काय साजरे करता. तुम्ही तर अडीच वर्ष कुंभकर्णाच्या झोपेत होता. रोज जागतिक कुंभकर्ण दिन साजरा करीत होता.

दाऊदशी संबंधातून नवाब मलिकांना जेलमध्ये जावे लागले, तेव्हा त्याचा साधा निषेध करण्याची हिंमत नव्हती, त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची हिंमत दाखविली नाही, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यावर कॅगने ताशेरे ओढले, त्याच्या चौकशीसाठी आजच एसआयटी गठीत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

चौकट…

अर्धवटराव पूर्ण व्हीडिओ ऐका!

आजच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या अकोल्यातील सभेच्या भाषणातील केवळ एक वाक्य ऐकवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्या भाषणातील 2 मिनिटांचा पूर्ण व्हीडिओ ट्विट करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण तुम्ही ऐकलेच नाही. असो आता ऐका. याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला. म्हणून म्हणतो, स्क्रिप्ट रायटर बदला!