मुंबई, 11 मे
हा लोकशाहीचा विजय आहे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे पूर्वस्थिती आणता येणार नाही. हे प्रकरण हस्तक्षेप करण्यासारखे नाही, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाला निर्णयास मुभा देण्यात आली आहे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजकीय पक्ष कोणता हे ठरविण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहेत, हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे. शिंदे यांना शपथविधी करण्यासाठी निमंत्रित करण्याचा राज्यपालांचा निर्णय योग्य होता, हेही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उद्धवजी, भाजपसोबत निवडून आलात आणि सरकार स्थापन करताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले होता, तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? त्यामुळे तुम्ही नैतिकता डोळ्यापुढे ठेवून नाही तर घाबरून राजीनामा दिला, हे मान्य केले पाहिजे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सर्वोच्च न्यायालयावर आणि लोकशाहीवर विश्वास असेल तर त्यांना, आजच्या निकालाने त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
( माहितीसाठी पत्रकार परिषदेची लिंक : https://www.youtube.com/live/4QAeY3vWjxg?feature=share)