Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

नागपूर येथे सावरकर गौरव यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते

By Devendra Fadnavis on April 4th, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

नागपूर, 4 एप्रिल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे नेते सुधांशू त्रिवेदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. श्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे:

काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना 6000 कविता लिहिल्या आणि त्या मुखोदगत केल्या. स्वत: यातना भोगताना इतरांना यातनांतून मुक्त करण्याचे काम वीर सावरकरांनी केले.

वीर सावरकरांनी जे अनन्वित अत्याचार भोगले, ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना काय समजणार? अस्पृश्यता संपविण्यासाठी त्यांनी पतितपावन मंदिराची निर्मिती केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे, काळाराम मंदिर सत्याग्रहात वीर सावरकरांनी पुढाकार घेतला.

मुधोजीराजे भोसले यांनी मला इंदिरा गांधी यांचे पत्र दिले. त्यात इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव केला. संसदेत जेव्हा ठराव आला, तेव्हा राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी यांनी पाठिंबा दिला. राहुल गांधी आपल्या आजी-आजोबांचेही विचार पाळत नाही.

राहुल गांधींवर बोलून मी वेळ वाया घालवणार नाही. पण, काही लोकांचे मला नवल वाटते…. उद्धव ठाकरे, कोण होतास तू, काय झालास तू अरे असा कसा वाया गेलास तू…

सत्ता येईल, सत्ता जाईल. पण, उद्धवजी, इतिहासात तुमचे नाव कायमचे कोरले जाईल. हिंदूत्त्वाचे विरोधक आणि सावरकरांचा द्वेष करणार्‍यांच्या यादीत तुमचे नाव कायमचे कोरले गेले आहे.

उद्धव ठाकरे, फडतूस नही मैं काडतूस हूँ मैं… याँद रखना, झुकेगा नही, मैं तो घुसेगा…

सडक्या आणि कुजक्या मेंदूचे लोक जोवर आहेत, तोवर ही सावरकर गौरव यात्रा सुरु राहील. त्यांचे मेंदू दुरुस्त होईस्तोवर आमचा लढा सुरू राहील

(माहितीसाठी कार्यक्रमाची लिंक: https://www.youtube.com/live/9MST2A3AVd8 )