धारवाड, 5 मे
राष्ट्रवादीतील घडामोडींसंदर्भात : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडी हा त्यांचा अंतर्गत चित्रपट, कलावंतही अंतर्गत आणि पटकथाही अंतर्गत, जोवर सिनेमाचा शेवट होत नाही, तोवर त्यावर प्रतिक्रिया कशी देणार? या कथानकाचा शेवट समजेल, तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देऊ.
बारसूसंदर्भात : उद्धव ठाकरेंचा हा दुटप्पीपणा आहे. स्वत:च पत्र लिहायचे आणि रिफायनरी बारसूला करा, असे सांगायचे. मग स्वत:च चिथावणीखोर कृती करायची. यातून उद्धव ठाकरेंचा विकास विरोधी चेहरा पुढे आला आहे. त्यांना समाजाशी, विकासाशी काही एक लेनदेन नाही. विविध खांदे ते शोधतच असतात. आता बारसूचा खांदा त्यांना मिळाला आहे.
(माहितीसाठी लिंक : https://www.youtube.com/live/T9l_-8Hhzzg?feature=share )