मुंबई, 18 मार्च
सुप्रसिद्ध अॅथलेटिक्स प्रशिक्षक आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते भाऊ काणे यांच्या निधनाने नागपुरातून अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणारे, संपूर्णत: क्रीडासमर्पित आयुष्य जगणारे व्यक्तिमत्त्व हरपले असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, भाऊ काणे यांनी अनेक क्रीडापटू घडविले. त्यातील काही आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी क्रीडा क्षेत्राला समर्पित केले होते. नवनवीन क्रीडापटू तयार व्हावेत, यासाठी नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी खेळाडू निर्माणावर भर दिला. त्यांचे आपल्यातून निघून जाणे, ही नागपूर-विदर्भाच्या क्रीडाजगताची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.