मुंबई, 18 मे
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी, सी. टी. रवी, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, शिवप्रकाशजी, ओमप्रकाश धुर्वे, जयभानसिंह पवैया, तरुण चुग, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, आशीष शेलार, चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुनील देवघर, विजया रहाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे:
उद्धव ठाकरे म्हणतात
सुप्रीम कोर्टात आम्ही जिंकलो….
आणि निकाल महाराष्ट्राच्या गावांगावांत पोहोचवा…
चला मी यावर थोडी स्पष्टता देतो. याचिकेत एकूण 8 प्रेयर होत्या. त्या अशा:
1) एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून निमंत्रित करण्याचा राज्यपालांचा निर्णय रद्द करा.
2) 3 जुलै 2022 रोजीची विधानसभेतील कार्यवाही आणि अध्यक्षांची निवड रद्द करा.
3) 4 जुलै 2022 रोजीची विधानसभेतील कार्यवाही आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूने पारित झालेला विश्वासदर्शक ठराव रद्द करा.
4) एकनाथ शिंदे आणि त्यांच्या अन्य आमदारांविरुद्ध विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित अपात्रतेच्या याचिका तुमच्याकडे बोलवा आणि संविधानाच्या कलम 142 नुसार त्यावर निर्णय घ्या
5) 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षांनी पाठविलेले पत्र रद्द करा.
6) 28 जून 2022 रोजी राज्यपालांनी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विधिमंडळ सचिवांना पाठविलेले पत्र रद्द करा.
7) घटनेच्या दहाव्या शेड्युलप्रमाणे 8 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षांनी बजावलेले समन्स रद्द करा.
8) भरत गोगावले यांनी अपात्रतेसंबंधी सुरू केलेल्या कार्यवाहीला स्थगिती द्या.
आता निकाल तुमच्यापुढे आहे.
मला सांगा या 8 मागण्यांपैकी कोणती मागणी मान्य झाली? एकही मागणी मान्य झाली नाही. हरकत नाही. आमच्या आनंदात सहभागी व्हा आणि हे गावोगावी पोहोचवा.
कर्नाटकच्या दिवशीच उत्तरप्रदेशातील निकाल
17 पैकी 17 जागा जिंकल्या. पण, देवबंदची चर्चा नाही.
देवबंद ही नगरपालिका, जिल्हा सहारनपूर. दारुल उलूम ही संस्था येथून काम करते.
भारतीय स्वातंत्र्यानंतर प्रथमच येथे कमळ फुलले.
आपला फॉर्म्युला मोदीजींची कार्यशैली
आपला नरेटिव्ह सामान्यांच्या विकासाचा…
मी त्यांच्याबाबतीत एवढेच म्हणेन…
फिर चिखतें फिर रहें बदहवास चेहरे,
फिर रचे जाने लगे है षडयंत्र गहरे…
आणि त्याला आपल्या बाजूने हेच सांगेन की,
न उनकी रस्म नयी है, न अपनी रीत नयी
यूं ही हमेशा खिलाये है, हमने आग में फूल
न उनकी हार नयी है, न अपनी जीत नयी…
2023 चे शेवटचे 6 महिने
2024 चे पहिले 6 महिने
हेच आपले ध्येय असली पाहिजे.
आणि त्यासाठी सर्वांनी झोकून दिले पाहिजे.
एकाचवेळी अनेक कामे
– संघटनेत संपर्क
– सरकार-जनता संवाद सेतू
– सरकारची कामे तर पोहोचवा.
समर्पण आणि केवळ समर्पण.
यांची लोकशाहीची व्याख्या काय ?
संजय राऊतांना बेल मिळाली की लोकशाहीचा विजय
नवाब मलिकांना बेल मिळाली नाही की, लोकशाहीची हत्या
– विश्वासाघातापासून ते विचार विसर्जनापर्यंत
– खंडणीखोरीपासून ते दाऊद संबंधांच्या मंत्रिमंडळापर्यंत
– अडीच वर्षांतील मंत्रालयातील अडीच तास ते कर्तव्यशून्यता
– पत्रकारांपासून ते राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गळचेपी
– पोलिस बदल्यांतून वसुली ते पोलिस दलाच्या गैरवापरापर्यंत असे सगळे प्रकार झाले.
नाना पटोले काय म्हणतात, अंबानीच्या घरापुढे स्फोटके मी ठेवली…
आता मलाही म्हणावे वाटते, 26/11 ची स्फोटके नाना पटोले यांनी ठेवली. तरीही मी नानांचा आभारी आहे. सचिन वाझे विषय मागे पडला की नाना त्याचे स्मरण करून देतात.
मी वज्रमुठीची 10 वाक्य सांगतो !
ती लिहिली आहेत, राज्यातील जाणकार नेते शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’मध्ये…. पूर्ण पुस्तक वाचाच. पण, आज फक्त पृष्ठ क्रमांक 318 आणि 319 ही दोनच पाने मी तुम्हाला सांगतो.
1) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरे यांच्यासोबत नव्हती.
2) उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी नसे, जी मुख्यमंत्र्यांकडे असली पाहिजे.
3) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पना आम्ही केली नव्हती (या वाक्याचा अर्थ त्यांनी करायला हवी होती)
4) त्यांचे कुठे काय घडतंय यावर बारीक लक्ष नसे. उद्या काय होईल, याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी.
5) त्यानुसार काय पाऊले उचलायची, हे ठरवायचे राजकीय चातुर्य असायला हवे. त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती.
6) त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं तरीही हे टाळता येणं जमलं नाही.
7) महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली.
8)संघर्ष न करता त्यांनी माघार घेतली.
9) उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते, पण ऑनलाईन. टोपे, अजितदादा, इतर मंत्री प्रत्यक्ष संपर्कात रहायचे.
10) उद्धव ठाकरेंचे फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणे, हे आमच्या पचनी पडणारे नव्हते.
हेच आम्ही तुम्हाला सांगत होतो, तर आम्हाला महाराष्ट्र द्रोही ठरविले.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे उद्धवजी,
जे बनायचे ते स्वत:च्या भरवशावर बनायला हवे.
दुसर्यांच्या बळावर ते बनता येत नाही.
कुणाचे कितीही बळ घेतले तर वाघ तर बनता येते, पण, तो वाघ सर्कशीतील असतो. स्वत:च्या बळावर वाघ झालात, तरच तो जंगलाचा राजा असतो.
महाराष्ट्रात एक पक्ष भाकरी फिरविणारा
दुसरा भाकरीचे तुकडे तोडणारा
तर तिसरा संपूर्ण भाकरीच हिसकावून घेणारा!
पण, आपला पक्ष गरिबांच्या भाकरीची चिंता करणारा.
(माहितीसाठी भाषणाची लिंक : https://www.youtube.com/live/6biCCcQInkI?feature=share )