मुंबई, दि 9 जून
अनुदानित आश्रमशाळांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मेघदूत निवासस्थान येथे स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांबाबत बैठक झाली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सामाजिक न्याय विभागाचे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांचे परिपोषण अनुदान वाढवणे तसेच आकस्मिक व सानुग्रह अनुदान यासंदर्भातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करण्यात येत असून या मागण्यांबाबत सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
#DevendraFadnavis #Maharashtra