#AbKiBaar400Paar
गेल्या 10 वर्षात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात नव्या आणि विकसित भारताकडे जगही आकर्षित झाले आहे आणि हाच विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने तसेच प्रत्येक नेत्याने स्विकारली आहे.
चला, पुन्हा आणू मोदी सरकार! अब की बार 400 पार!
संकल्प महाविजयाचा !
‘राष्ट्र प्रथम’ या आमच्या तत्वानुसार एक मजबूत आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. आमच्या मायबाप जनतेच्या विश्वासाशिवाय आणि अतुलनीय समर्थनाशिवाय ते अकल्पनीय आहे. पंतप्रधान मा. मोदीजींच्या नेतृत्वात समाजातील सर्व घटकांचे जीवन आज सकारात्मकरित्या बदलत आहे. जगानेही मा. मोदीजींचे वैश्विक नेतृत्व स्वीकारले आहे. 2047 पर्यंत विकसित भारत करण्याची मा. मोदीजींनी गॅरंटी दिली आहे. चला सर्व मिळून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बनवूया आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली नव्या आणि विकसित भारताचे साक्षीदार होऊ या. महाविजयाचा संकल्प करुया.
जाहीर प्रचारसभा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
SantVachan
|| संत बोले, मोदी चाले ||
आपल्या महाराष्ट्राला संतांची अनोखी परंपरा लाभली आहे, हे आपले अपार भाग्य आहे. अर्थातच यात भागवत धर्माची फार मोठी भूमिका राहिली आहे. भागवत धर्माची पताका हाती घेऊन संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र धर्माचे भान पुन्हा जागृत केले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला आणि जगदगुरु संत तुकोबारायांनी कळस चढविण्याचे काम केले.
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन ।
शब्द वाटूं धन जनलोकां ॥
हे शब्दरुपी संस्कारांचे, समाजप्रबोधनाचे धन जे आपल्या संतांनी आपल्याला दिले, त्याची ताकद खूप मोठी आहे. हीच ताकद ओळखून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संताचे विचार आचरणात आणत लोककल्याणाची असंख्य कामे गेल्या 10 वर्षांत केली.
… आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या तत्वानुसार देशातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी ते आजही अहोरात्र कार्यरत आहेत.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती।
समर्थ भारताच्या पाठी मोदी शक्ती !
संपूर्ण बुकलेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
भाजपाला मत म्हणजेच विकासाला मत !
लोकसभा निवडणूक 2024 ची ही निवडणूक ही कुठल्या एका व्यक्तीच्या विजयाची नाही तर ही देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक देशाचा नेता निवडून देण्याची आहे. कमळाचे बटण हे येणाऱ्या पिढ्यांच्या परिवर्तनाचे बटण आहे.