Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प

By Devendra Fadnavis on February 27th, 2024
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 27 फेब्रुवारी

देवेंद्र फडणवीस यांनी केले अजितदादांचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प आज महायुती सरकारने सादर केला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.

हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वच घटकांचा विचार करणारा तसेच राज्याच्या समतोल विकासाचा आहे. सबका साथ सबका विकास या मंत्रावर आधारित या अर्थसंकल्पाने शेतकरी, महिला, युवा, विविध समाज घटकांना मोठा दिलासा देणारा आहे. विदर्भातील सिंचन सुविधांसाठी 2000 कोटींची तरतूद त्यात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजना जाहीर करण्यात आली असून 8.50 लाख कृषिपंप पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत. 37,000 अंगणवाड्यांना सुद्धा सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी 34,400 घरकुले बांधण्यात येणार आहेत. नागपूर विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी 578 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. सर्वच पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मोठी आर्थिक तरतूद यात करण्यात आली आहे. 2000 नवीन प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र राज्यात सुरू करण्यात येणार आहेत. आज मराठी भाषा गौरव दिवस असून कवितेचे गाव म्हणून वेंगुर्ला गावाचा विकास करण्याचा सुद्धा मनोदय यात आहे. एकूणच आपल्या संस्कृतीचा गौरव सुद्धा यात आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.