मुंबई, 22 एप्रिल
श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती ही दंगलींसाठी साजरी केली जाते, असे विधान करणे, हा समस्त समाजाचा आणि रामभक्तांचा अपमान आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानासंदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांचे हे विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशभरात श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती अतिशय श्रद्धेने साजरी केली जाते. प्रभू श्रीराम आणि भगवान हनुमानाप्रती सर्वांच्या मनात अपार श्रद्धा आहेत. दंगलींसाठी ती साजरी केली जाते, असे म्हणणे हा समस्त समाजाचा आणि रामभक्तांचा अपमान आहे. भविष्यात दंगली होतील, असे विधान करणे म्हणजे तुम्ही दंगली करायचे ठरविले आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. नेत्यांनी अतिशय संयमाने वागले पाहिजे. प्रत्येक वेळी सनसनाटी निर्माण करणे योग्य नाही.
(माहितीसाठी कार्यक्रमाची लिंक: https://www.youtube.com/live/cAezVCdee6o?feature=share )