जपान दौरा पाचवा दिवस
फिल्मसिटीसाठी सोनीला निमंत्रण, तंत्रज्ञान आणि कंटेट क्षेत्रात महाराष्ट्रासोबत काम करण्याची सोनीची इच्छा असल्याचे सोनी ग्रुप कार्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरो कॅम्बे यांनी संगितले. मुंबई ट्रान्सहार्बर लिंकमुळे तयार होणाऱ्या तिसर्या मुंबईत बांधकाम संधींसाठी सुमिटोमोला निमंत्रण. जपान गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करणार असल्याचे जाहीर. पाच दिवसांच्या विविधांगाने विशेषत: राज्यात उद्योग आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने यशस्वी दौर्यानंतर देवेंद्र फडणवीस मायदेशी परतले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोनी ग्रुप कार्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरो कॅम्बे यांची भेट घेतली. तंत्रज्ञान आणि कंटेट क्षेत्रात महाराष्ट्रासोबत काम करण्याची सोनीची इच्छा आहे. यापुढे संशोधन क्षेत्रात अधिक गुंतवणूक करणार असून त्यात महाराष्ट्राला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
25 August 2023View Tweet
डेलॉईट तोहमत्सु समूहाच्या ईको नागात्सु यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. ग्रीन हायड्रोजन, लॉजिस्टीक, इलेक्ट्रीक व्हेईकल, स्टार्टअपस इत्यादी क्षेत्रांबाबत यावेळी चर्चा झाली.
25 August 2023View Tweet
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौऱ्यावर असताना बीएमसी कमिश्नर व राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना वेगाने काम करण्याचे व अंतर्गत समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी दिले.
25 August 2023View Tweet
सुमिटोमो रियालिटी अँड डेव्हलपमेंट कंपनीचे अध्यक्ष कोजुन निशिमा यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.धारावी पुनवर्सन प्रकल्पाबाबत माहिती त्यांनी यावेळी दिली.
25 August 2023View Tweet
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 5 दिवसांचा जपान दौरा यशस्वीरित्या पूर्ण! या दौऱ्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी व गुंतवणूक आणण्यासाठी अनेक बैठका देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या.
25 August 2023View Tweet