जपान दौरा चौथा दिवस
वर्सोवा-विरार सी लिंकला जपान करणार संपूर्ण सहकार्य, जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट. इशिकावा गुंतवणूकदार 2024 आरंभी महाराष्ट्रात येणार. मित्सुबिशी करणार पुण्यात सॉफ्टवेअर क्षेत्रात गुंतवणूक. नागपुरातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर सहकार्यासाठी केले एनटीटीला निमंत्रित, जायका भेटीत सुद्धा वर्सोवा-विरार प्रकल्पासाठी सहकार्याची विनंती, मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासाठी मागितले जायकाचे सहकार्य, जपान पंतप्रधानांच्या विशेष सल्लागारांसमवेत बैठक, मेट्रो-3 अडथळे दूर केल्याबद्द गौरव.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूळ नागपूरचे रहिवासी असलेल्या पण सध्या जपान येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांची भेट घेत त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.
24 August 2023 View Tweet
इशिकावाचे वाईस गव्हर्नर अतूको निशिगाकी यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुपा इंडस्ट्रियल पार्कमध्ये गुंतवणूक करण्याचा मनोदय व्यक्त केला.
24 August 2023View Tweet
मित्सुबिशीचे उपाध्यक्ष हिसाहिरो निशिमोटो यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. तळेगाव येथे मित्सुबिशीने गुंतवणूक केली असून पहिला टप्पा डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे.
24 August 2023View Tweet
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार व उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो 3 प्रकल्पातील अडथळे दूर केल्याबद्दल आभार मानले. यावेळी वर्सोवा-विरार सी लिंकला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन जपान सरकारने दिले.
24 August 2023View Tweet
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनटीटी डेटाचे उपाध्यक्ष हिदेएकी ओझाकी यांची भेट घेतली.राज्यात डेटा सेंटर धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. एनटीटीने मुंबई पुण्याव्यतिरिक्त नागपूर जे मध्य भारतातील महत्वाचे ठिकाण ठरू शकते त्याबाबतही विचार करण्याचे सुचवले.
24 August 2023View Tweet
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जायकाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नाकाझावा केईचिरो यांची भेट घेतली. मेट्रो-3, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन इत्यादी विविध प्रकल्पांना वित्तपुरवठा केल्याबद्दल आभार मानले. नागनदी आणि मुळा-मुठा नदी संवर्धन सुद्धा सुरू झाले असून त्यावर ‘वॉर रूम’च्या माध्यमातून देखरेख ठेवली जात आहे.
24 August 2023View Tweet
जपानमधील सर्वांत मोठी आणि सुमारे 30 % वीज उत्पादन करणाऱ्या जेरा कंपनीचे कार्यकारी अधिकारी युचिरो काटो यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. एलएनजीवर आधारित सार्वजनिक वाहतूक प्रकल्पासाठी, एक भागीदार म्हणून महाराष्ट्राकडे पहावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
24 August 2023View Tweet